स्वप्नं…

December 3, 2009

आपली स्वप्ने सगळीच खरी
अन दुसर्याची दिखावा असतो,

आपले जगणे “जगणे”असते
बाकी सारा भुलावा असतो.

स्वप्नांना तुटण्याची झळ बसते
तेव्हा स्वप्नांची किंमत समझते,

जशी कविता संपल्यावर
तिच्यातली गंमत समझते.

म्हणुनच मी कोणावर हसत नाही
स्वप्नं मी ही पाहतो,

स्वप्नं वजा झाल्यावर जगण्यात
फ़क्त आभास राहतो…


नास्तिक…

December 3, 2009

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबत
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा…
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, ” दर्शन देत जा अधुन मधुन……..
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! “

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे….

…संदीप खरे


या सुंदर जीवनात कधी कधी…

December 3, 2009

या सुंदर जीवनात कधी कधी..
पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत
विचारात गुंतल्यासारख कधी कधी
अन पाहताना तिच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच…
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी
नंतर “जागली होतिस का रात्री?”
म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..
हात तिचा चोरुन कधी कधी
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय तिचा निघाल्यावर कधी कधी
असते रागवायचे लटकेच
“अस काही नाहिये” म्हणून कधी कधी

विरहात तीच्या …
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..
पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..
पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी…


कुणीतरी असलं पाहिजे…

December 3, 2009

कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..

सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…
मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…

इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू नकोस”
असं बजावायला…

उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला….
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला…..


निर्णय…

September 1, 2009

निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा दोष नाही.
अजिबात निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय हे अधिक बरे !
चुकीचा निर्णय घेणार्‍या माणसांनीसुध्दा जीवनात यश मिळवले आहे.
परंतु जे निर्णय घेऊ शकत नाहीत , ज्यांचे मन नेहमी ‘ हे की ते ‘ ( Double mind ) या गोंधळात गुरफटलेले असते असा मनुष्य मात्र कधीच यशस्वी झाल्याचे ऐकीवात नाही.
ज्याला निर्णय घेता येऊ शकत नाही , त्याला कृती करता येत नाही. त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही.

नकारात्मक विचार मनात आले की लक्षात ठेवा,
गणितातली बेरजेची खूण ही वजा बाकीच्या दोन खूणांनी मिळून बनलेली असते…
घड्याळ बंद जरी असले तरी दोनदा वेळ बरोबर सांगते…


ते पण एक वय असतं…

September 1, 2009

ते पण एक वय असतं…

ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत एम.एस.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या ‘डोमिनियन स्टेटस’ आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं…


व. पु. काळे…

August 28, 2009

आई-वडिल, भाऊ-बहिण वगैरे नाती
आपल्याला जन्माने मिळतात,
पण मैत्रीचे नाते आपण स्वतः मिळवतो
म्हणुनच अनेकवेळा
नातेवाईकांपेक्षा मित्रांमित्रांत
अधिक जिव्हाळा असतो…

अलंकाराप्रमाणे मित्र केवळ
सौंदर्य वाढवणारे नसावेत
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील
पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र
फक्त दैवानेच लाभतात…

……… व. पु. काळे.


आयुष्य खूप सुंदर आहे…

August 28, 2009

आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर

दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर

अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर

समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर

काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर

फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर

अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर

यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर

मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर

रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर

निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर

वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर

कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर

प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर

“त्यागा” पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर

उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर….

खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे

उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न…. पण
अगणित उत्तरांचं पीक आहे…


मातृभाषा आमची मराठी आहे…

August 28, 2009

अमृताहून गोड
आशी जीची ख्याती आहे
रोमारोमात मराठ्याच्या
भरलेली जीची व्यापती आहे
नशीबवान आम्ही येथे जन्मलो
मातृभाषा आमची मराठी आहे…

तन मराठी मन मराठी
श्वास मराठी ध्यास मराठी
मराठी जगण्याची शक्ति आहे
नशीबवान आम्ही येथे जन्मलो
मातृभाषा आमची मराठी आहे…

घडविले जिणे वाढविले जिणे
सन्मानने जगायला शिकविले जिणे
आठवणीने ही जिच्या
अद्यान्नापासून पासून मुक्ती आहे
नशीबवान आम्ही येथे जन्मलो
मातृभाषा आमची मराठी आहे…


आता तरी हसून घे…

August 28, 2009

आता तरी हसून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

माहीत आसते सर्वाना फुलणारे
फूल हे सुकनारेच असते
किती ही ते जपले तरी
कोमेजनारच असते
आज फूललय ते सुगंधात न्हाऊन घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

काही बरोबर आणलेल नसत
काही बरोबर नेता येत नाही
इतकी दुर्दैवी नको बानूस की कोणाला
क्षणभर सुख ही देता येत नाही
देण्यात ही सुख आसते
ईतके तरी समजावून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

काहीच आपल्या हातात नसत
काहीच आपण करत नाही
किती ही योजना आखल्या
तरी तसे काही घडत नाही
कश्याला विचार करतेस होईल तसे करून घे
कोणावर तरी प्रेम कर
आपला त्याला मानून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

तुला काय वाट ते तूच
सारे करत आसतेस
नशिबात जे आसते तसेच
सारे घडत असते
मीळतय जे आत्ता तुला
ते तर उपभोगून घे
काळजी सोड नशिबवर स्वतावर हसून घे
शहाणपण ठेव बाजूला
मनप्रमाणे जगून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे


Follow

Get every new post delivered to your Inbox.